Abhiwachan Competition
अभिवाचन स्पर्धेची उद्दिष्ट्ये –
-
विद्यार्थ्यांमधे अभिवाचन ही संकल्पना रुजविणे.
-
विद्यार्थ्यांमधील अभिवाचन या वाचन कौशल्याचा विकास करणे.
-
विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देणे.
-
अभिवाचनाच्या साह्याने विद्यार्थ्यांच्या भाषेचा विकास करणे.
-
अभिवाचनाच्या माध्यमातून उत्तमोत्तम साहित्यकृती वाचकापर्यंत व श्रोत्यांपर्यंत पोहोचविणे.
-
अभिवाचनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख आणि व्यवसायाभिमुख बनविणे.
साहित्याच्या प्रांतामध्ये लेखन कौशल्याइतकेच वाचन कौशल्यालाही अत्यंत महत्वाचे स्थान आहे. कथा, कविता, कादंबरी, नाटक इत्यादि साहित्यलेखन वाचकांपर्यंत आणि श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कथाकथन, काव्यवाचन, संवादवाचन यांसारखी वाचन कौशल्ये वर्षानुवर्षे आपले अस्तित्व टिकवून आहेत. यात 'अभिवाचन' या नव्याने रुजलेल्या वाचन कौशल्याचा समावेश झाला आहे. या अभिवाचन कौशल्याचे स्वरूप आणि उद्देश खालीलप्रमाणे सांगता येतील.
अभिवाचन हा वाचनाचाच एक प्रकार असून यामध्ये वाचनासाठी निवडलेली साहित्यकृती, वाचकाचा आवाज, आवाजातील चढ-उतार, शब्दांच्या उच्चारातील स्पष्टता, शब्दांचे आरोह-अवरोह, साहित्यकृतीच्या आशयाशी निगडीत संगीताचा वापर आणि श्रोत्यांवरील प्रभाव या गोष्टी महत्त्वाच्या असतात. अभिवाचन हे एकट्याने किंवा सामुहिकरीत्यासुद्धा करता येते. आज अभिवाचनाचे आकाशवाणी, दूरदर्शन यांसारख्या माध्यमामध्ये अनेक प्रयोग होताना दिसतात.
Topic:
Any type of literature except drama & poetry can be read.
अभिवाचन स्पर्धेचे सदस्य
1. डॉ. प्रदीप पाटील (समन्वयक) ९७६३२४३०१७
2. डॉ. स्वप्नील बुचडे (सदस्य) ९९७५४४१६११
3. प्रा. नम्रता ढाळे (सदस्य) ८८८८०४५६४०
4. प्रा. अजय पाटील (सदस्य) ९८८११९९३९३
5 प्रा. ऐश्वर्या हिंगमिरे (सदस्य) ९८३४०१६०२०
अभिवाचन स्पर्धेचे नियम -
1. अभिवाचन स्पर्धेसाठी कमीत कमी दोन आणि जास्तीत जास्त चार विद्यार्थ्यांचा गट आवश्यक आहे.
2. अभिवाचन स्पर्धेसाठी 6 + 2 मिनिटांचा वेळ असेल.
3. अभिवाचन स्पर्धेसाठी नाटक आणि कविता हे वाङमयप्रकार सोडून कोणत्याही वाङमयप्रकारचे अभिवाचन करता येईल.
4. अभिवाचनासाठी संगीताचा वापर करता येईल. सादरीकरणाच्या आधी संगीताची ऑडिओ क्लिप संयोजकाकडे देणे आवश्यक आहे.
5. वेळेत आलेल्या प्रवेशिकानाच स्पर्धेत सामावून घेण्यात येईल.
6. परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल.